Tuesday, February 27, 2024
Homeराजकारणतळवडे कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे निधन

तळवडे कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे निधन

पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत जखमी रुग्ण *प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) यांचे रात्री पावणे दोन वाजता तर *अपेक्षा तोरणे (वय १८ वर्षे) यांचे सकाळी साडे सहा वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन झाले आहे. मृतांबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. मनाला वेदना देणारा हा प्रसंग असुन कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असुन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तळवडे तेथील एका कारखान्यामध्ये दि. ८ डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे दि.९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे दि. १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर उर्वरीत जखमींपैकी आज २ जणांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यामुळे तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या ११ इतकी झाली आहे.

या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, सुमन गोंधळे, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या प्रकृतीविषयी आयुक्त शेखर सिंह विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच ते वेळोवेळी या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहेत.

उपचारासाठी दाखल असलेल्या तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि २ मदतनीस यांची २४x७ नेमणूक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments