Tuesday, December 5, 2023
Homeगुन्हेगारी१८ वर्षीय मुलाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न .. पोलिसांमुळे वाचला जीव

१८ वर्षीय मुलाने उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न .. पोलिसांमुळे वाचला जीव

वडील दारूचे व्यसन करतात. कमी शिक्षण झाल्याने हाताला काम नाही मिळत. अशा मानसिक तणावाला कंटाळून एका १८ वर्षीय युवकाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयन्त करत असताना, मुंढवा पोलिसांनी तत्परता दाखवत त्याचा जीव वाचवला. त्यानंतर मुलाला मुंढवा पोलीस ठाण्यातचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी त्याचे समुपदेशन करून नोकरी लावण्याचे आश्वासन दिलं. ही घटना ही घटना दि. ३१ रोजी दुपारच्या वेळेत घडली आहे. याबाबत कोणताही प्रकारचा गुन्हा दाखल केला गेलेला नाही.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ जुलैला मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असणाऱ्या बिट मार्शल महेश पाठक, पोलीस हवालदार मेमाने, यांना नियंत्रण कक्षातून कॉल आला की, मुंढवा परिसरात असणारी सर्वोदय कॉलनी इथे एक इसम आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाने यांनी घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी रवाना केले. कार्यरत असलेले सह पो, नि महानोर, पो.हवा. मेमाणे, पो. हवा. पाठक, पो हवा. भांगदुर्ग, पो शि. कोकरे हे पाच मिनीटात घटनास्थळी हाजर झाले.

गणपती मंदिराच्या मागे सर्वोदय कॉलिन मुंढवा पुणे येथे पोलीस दाखल झाल्यानंतर आत्महत्या करणारा मुलगा नाव प्रतीक नरेंद्र जाधव (१८) हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देत होता. मात्र त्याची आई पद्मा ही तिच्या मुलाला वाचवण्यासाठी तेथील नागरिकांना विनंती करत होती. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चालाकी दाखवत दोघांनी त्याला बोलण्यात गुंतवले आणि आत्महत्या का करत आहे ? असे त्याला विचारण्यात आले. तर त्याने सांगितलं की, माझ्या वडिलांना दारू पिण्याचे व्यसन आहे. माझं कमी शिक्षण झाल्याने मला कुठे काम नाही मिळत आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचं त्या मुलाकडून सांगण्यात येत आहे.

त्याच वेळेला बाकी दोन पोलीस कर्मचारी हे जिन्याने तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर वाचवण्यासाठी निघाले असताना प्रतीकला त्याची चाहूल लागली. त्यानंतर प्रतीक उभ्या असलेल्या टेरेसवरून त्याने दुसऱ्या बिल्डिंगवर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सापळा रचत प्रतीक याला ताब्यात घेतलं. प्रतीक आणि त्याची आई-वडिलांना मुंढवा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाने यांच्यासमोर हाजर करण्यात आले. ताम्हाने यांनी आत्महत्या करणाऱ्या मुलाचे समुपदेशन केलं. तसेच त्याला नोकरीला लावण्याचे आश्वासन दिलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments