Friday, September 11, 2026
Homeआंतरराष्ट्रीयपिंपरी चिंचवडमध्ये १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा

पिंपरी चिंचवडमध्ये १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा

१२ ते २३ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा रंगणार थरार

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वी हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा १२ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी दिली आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याशिवाय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, पार्थ पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तसेच आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, डॉ. निलम गोऱ्हे, अमित गोरखे, विक्रम काकडे, शंकर मांडेकर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, ल प्रभाग अध्यक्ष रेखा देवकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, मनिषा लांडे, वर्षा जगताप, योगेश बहल यांच्यासह महापालिकेचे सर्व प्रभाग अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे तसेच नगरसदस्य, नगरसदस्या व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील युवा महिला हॉकीपटूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा पिंपरी चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेच्या आयोजनामुळे शहरातील क्रीडाप्रेमी तसेच युवा खेळाडूंना उच्च दर्जाच्या हॉकी सामन्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments