Thursday, February 6, 2025
Homeबातम्याहवेली तालुक्यातील १५ शाळा अनधिकृत, शिक्षण विभागाकडून यादी जाहीर

हवेली तालुक्यातील १५ शाळा अनधिकृत, शिक्षण विभागाकडून यादी जाहीर

हवेली तालुक्यातील १५ शाळा अनधिकृत असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी जाहीर करण्यात आले. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी; तसेच मुलांचा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी सजग राहण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी नीलिमा म्हेत्रे यांनी बुधवारी १५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. काही शाळांनी नियमांनुसार भौतिक सुविधा नसणे, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक, ‘यूडायस’ क्रमांक प्रदर्शित केले नसल्याचेही शिक्षण विभागाला आढळले आहे. या सर्व शाळांनी मान्यता नसतानाही प्रवेश दिले आहेत. या शाळांनी आरटीई कायदा व स्वयंअर्थसहाय्यित कायदा उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे

१. नारायणा ई.टेक्नो स्कूल, वाघोली
२. श्रीमती. सुलोचनाताई झेंडे सेमी इंग्लिश स्कूल, कुंजीरवाडी
३. न्यू विज्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा
४. मारिगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, कदम वस्ती, सोलापूर रोड
५. द टायग्रिस इंटरनॅशनल स्कूल, कदम वस्ती, सोलापूर रोड
६. रामदरा सिटी स्कूल, लोणी काळभोर
७. स्मार्ट किड्स इंग्लिश स्कूल, आव्हाळवाडी, वाघोली
८. विठ्ठल तुपे ई-लर्निंग स्कूल, पिंपरी सांडस,
९. रिव्हरस्टोन इंटरनॅशनल स्कूल, पेरणे
१०. ग्यानम ग्लोबल स्कूल, उरुळी देवाची
११. कल्पवृक्ष इंग्लिश स्कूल, किरकटवाडी
१२. क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हेवाडी
१३. पुणे इंटरनॅशनल स्कूल, अष्टापूर मळा, लोणीकाळभोर
१४. छत्रभुज नरसी स्कूल, अमनोरा पार्क टाउन, साडेसतरा नळी, हडपसर
१५. विब्ग्योर स्कूल, केसनंद

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments