Wednesday, September 11, 2024
Homeताजी बातमी15 लाख पिंपरी-चिंचवडकर सारथी ठरले सारथीचे लाभार्थी

15 लाख पिंपरी-चिंचवडकर सारथी ठरले सारथीचे लाभार्थी

१६ जानेवारी २०२०,
पिंपरी-चिंचवकरासांठी वरदान ठरलेल्या सारथी हेल्पलाईनचा 15 लाख जणांनी लाभ घेतला आहे. 15 ऑगस्ट 2013 ते 13 जानेवारी 2020 अखेर सारथी हेल्पलाईनद्वारे एकूण 15 लाख एक हजार 945 नागरिकांनी संपर्क साधला. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याबाबत सेवेचा लाभ घेतला आहे. संकेतस्थळ आणि वेब लिंक सहा लाख 91 हजार 513, हेल्पलाईन तीन लाख 76 हजार 726, पीडीएफ पुस्तिका दोन लाख 77 हजार 624,ई-बुक एक लाख 22 हजार 164, मोबाईल अँप्लिकेशन 25 हजार 843, छापील पुस्तिका आठ हजार 75 अशा एकूण 15 लाख एक हजार 945 नागरिकांनी सारथीचा लाभ घेतला आहे.

महापालिकेच्या विविध विभागांकडील नागरी सेवा/सुविधांबाबतची माहिती नागरिकांना तत्काळ उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक संगणकीकृत हेल्पलाईन (कॉल सेंटर) ही सुविधा तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट
2013 रोजी सुरू करण्यात आली आहे. ‘सारथी’ हेल्पलाईन दूरध्वनी सेवा 24तास आठवड्यातील सातही दिवसनागरीकांसाठी उपलब्ध असून त्याद्वारे नागरिकांना आवश्यक असलेली माहिती फोनवरून उपलब्ध होत आहे.15 ऑगस्ट 2013 ते 13 जानेवारी 2020 अखेर सारथी हेल्पलाईनद्वारे एकूण 15 लाख एक हजार 945 नागरिकांनी संपर्क साधला. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. एकूण 6 लाख 91 हजार 613 नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरून सारथी वेबलिंकद्वारे माहिती प्राप्त करून या सेवेचा लाभ घेतला आहे. सारथी हेल्पलाईन, सामान्य नागरिकांना त्यांचे दैनंदिन प्रश्‍नांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने महापालिकेच्या सेवांव्यतिरिक्त नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडील विविध सेवा, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड, मतदार नोंदणी इत्यादी सेवा व एमआयडीसी,प्राधिकरणमहावितरण,
आर.टी.ओ इत्यादी विविध विभागांकडील सेवांबाबतची माहितीउपलब्ध करण्यात आलेली आहे.

विविध विभागांशी संबंधित एकूण एक लाख 65 हजार 759 तक्रारी प्राप्त नागरिकांना वेबलिंकद्वारे उपलब्ध करण्यात आलेली सारथी पुस्तिका संगणक/आयपॅड/टॅबलेट द्वारे वाचणे व त्यामधील आवश्यक माहिती शोधणे, उपलब्ध करून घेणे, सहजतेने हताळणे सोईचे व्हावे यादृष्टीने सारथी ई-बुक उपलब्ध करण्यात आले आहे. शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून कामकाजानिमित्त येणा-या बहुभाषिक नागरिकांच्या सोईसाठी सारथीद्वारे उपलब्ध असलेल्या सर्व सेवांची माहिती, सारथी पुस्तिका,वेबलिंक, मोबाईल अँप्लिकेशन, ई-बुक इत्यादी मराठी भाषेबरोबरच इंग्रजी व हिंदी भाषांमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या योजनेचा लाभ पाच लाख दोन हजार 586 नागरिकांनी घेतला आहे.

13 जानेवारी 2020 अखेर सारथी हेल्पलाईन येथे विविध विभागांशी संबंधित एकूण एक लाख 65 हजार 759 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एक लाख 60 हजार 787 तक्रारींचे निराकरण झाले आहे. तक्रारी निराकरण करण्याची टक्केवारी 97 टक्के आहे.

‘सारथी’ या महत्वाकांक्षी प्रकल्पास राज्य शासनाकडील राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा अंतर्गत दहा लाख प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा सुनियोजित उपयोग करून नागरी सुविधा देणेबाबत महाराष्ट्र राज्य शासनाचा सन 2012-2013 करिता सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. सारथी उपक्रम सुरू झाल्यापासून मागील सहा वर्षात राज्यस्तरीय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांनी सारथीला भेट दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments