Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रमावळ लोकसभा मतदारसंघात 14 मतदान केंद्र संवेदनशील तर सर्वाधिक 6 संवेदनशील मतदान...

मावळ लोकसभा मतदारसंघात 14 मतदान केंद्र संवेदनशील तर सर्वाधिक 6 संवेदनशील मतदान केंद्र पिंपरी विधानसभेत

मावळ लोकसभा मतदारसंघात २५ लाख ९ हजार ४६१ मतदार असून, दोन हजार ५५६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १४ मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. सर्वाधिक सहा संवेदनशील मतदान केंद्र पिंपरी विधानसभेतील आहेत. संवेदनशील केंद्रांवर निवडणूक विभागासह पोलीस यंत्रणेचे विशेष लक्ष असणार आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

मावळ लोकसभेतील पनवेल विधानसभा मतदारसंघात ५३८ पैकी तीन मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. कर्जत मतदारसंघात ३३९ आणि उरण मतदारसंघात ३४० मतदान केंद्र आहेत. त्या दोन्ही मतदारसंघात एकही केंद्र संवेदनशील नाही. मावळ विधानसभा मतदारसंघात ३९० पैकी केवळ एक केंद्र संवेदनशील आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५४९ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी चार केंद्र हे संवेदनशील आहेत. तर, पिंपरी विधानसभेत ४०० मतदान केंद्र आहेत. त्यापैकी सर्वाधिक सहा मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. संवेनदशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाते. त्या केंद्रावर स्वतंत्र निरीक्षक नेमला जातो. त्या केंद्रावरील मतदानावर ‘सीसीटीव्ही’ कॅमरे लावून ऑनलाइन प्रक्षेपण केले जाते. तसेच, एक सूक्ष्म निरीक्षक, केंद्रीय पोलीस दलातील एक कर्मचारी तैनात केला जातो.

संवेदनशील मतदान केंद्र ठरविण्याची पद्धत
ज्या मतदान केंद्रातील एखाद्या घटनेमुळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यात मतदान केंद्र बळकावणे, बोगस मतदानाचे प्रमाण अधिक असणे, दादागिरी करणे, भांडणे होणे, शिवीगाळ करणे आदी प्रकार होणे. केंद्रावर एकाच उमेदवाराला ७५ टक्के मतदान झाले असल्यास, झालेल्या मतदानांपैकी ९० टक्के मतदान एकाच उमेदवाराला झाले असल्यास तसेच एका कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत सलग एकाच मतदान केंद्रावर नसणे अशा मतदान केंद्रांना संवेदनशील केंद्र म्हणून घोषित केले जाते.

निवडणूक आयोगाच्या निकषानुसार संवेदनशील मतदान केंद्रांवर उपाययोजना करून अंमलबजावणी केली जाईल. त्यानुसार १४ मतदान केंद्राचे ऑनलाइन प्रक्षेपण, एक सूक्ष्म निरीक्षक, एक अतिरिक्त पोलीस तैनात केला जाणार आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments