९ नोव्हेंबर २०२०,
मुंबई-पुणे महामार्गावरील महावीर चौक चिंचवड येथे पोलिस वसाहतीच्या आवारात आज सोमवारी (दि. ०९) रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली, यामध्ये १३ मोटारी आणि दोन रिक्षा आगीत जळून खाक झाल्या आहेत. आज दुपारी अचानक मोठी भयानक आग लागली. यात अनेक गुन्ह्यात जप्त केलेल्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या असून, आवारात पार्क केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक विभागाची वाहने घटनास्थळी वेळेत दाखल झाली.

दरम्यान महापौर माई ढोरे यांनी पिंपरी पोलीस स्टेशनला जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. माजी उपमहापौर हिंगे व पोलीस अधिक्षक उपस्थित होते. पिंपरी पोलीस ठाण्याच्या वतीने विविध गुन्ह्यात मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. काही बेवारस सापडलेल्या आहेत तर काही गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत.
यामध्ये १३ मोटारी आणि दोन रिक्षा असे एकूण १५ वाहनांचा समावेश आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. जवळच पेट्रोल पंप असल्याने आग धुमसू नये याची काळजी घेण्यात आली. अग्निशामकदलांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून कोणताही जिवितहानी झाली नाही.
