Monday, June 8, 2026
Homeताजी बातमीबारावी परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आज बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केला आहे.  मंडळाने निकालाची माहिती सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेतून जाहीर केली. प्रत्यक्षात निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यंदाही बारावीमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. दरम्यान आजच्या निकालामध्ये यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.74 टक्के इतका लागला आहे. तर यामध्ये सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46  टक्के इतका लागला आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण तिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे म्हणजे मुलींची उत्तीर्णणशतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07 टक्के ने जास्त आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून mahahsscboard.in, hscresult.mkcl.org,  maharashtra-hsc-12-results आणि results.digilocker.gov.in या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन निकाल पाहता येतील. तर, महाविद्यालयांना आवश्यक कॉलेज लॉग-इनसह mahahsscboard.in वर एकत्रित निकाल पाहता येतील.

विभागनिहाय निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे

पुणे – ९१.३२

नागपूर – ९०. ५२

छत्रपती संभाजीनगर – ९२.२४

मुंबई -९२.९३

कोल्हापूर – ९३.६४

अमरावती – ९१.४३

नाशिक – ९१.३१

लातूर – ८९.४६

कोकण – ९६.७४

निकालाचा टक्का घसरला

फेब्रुवारी-मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के होता. फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल १.४९ टक्केने कमी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments