Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीमतदानासाठी मतदान ओळखपत्राशिवाय अन्य १२ पुरावे ग्राह्य,निर्भयपणे मतदान करा - अर्चना यादव

मतदानासाठी मतदान ओळखपत्राशिवाय अन्य १२ पुरावे ग्राह्य,निर्भयपणे मतदान करा – अर्चना यादव

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघा करिता दि. २०/११/२०२४ रोजी मतदान होणार आहे, मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर ओळखीचे पुरावा ग्राह्य धरले आहेत. मतदार केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतात परंतु मतदाराकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात यावा अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. 

यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक,  आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (RGI) यांनी दिले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र सरकार / राज्य शासन / सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र.   

मतदान ओळखपत्र व इतर १२ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत तसेच सदर ओळखपत्र हे मूळ प्रत (ORIGINAL)सादर करावे. तसेच मतदान केंद्रामध्ये कोणत्याही मतदारास किंवा प्रतिनिधीस मोबाईल नेता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघ यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments