उन्हाळ्यात सर्वांच्या आवडीचं पेय म्हणजे ऊसाचा रस. मात्र, आता याच ऊसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी (GST) भरावा लागणार आहे. उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने याबाबतचा निर्णय दिला आहे. त्यामुळं आता ऊसाचा महाग होणार आहे. मात्र, तुम्ही जर रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेतला तर त्यासाठी हा GST द्यावा लागणार नाही.
ऊसाचा रस हा कृषी उत्पादनात मोडत नाही. कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या अटींची पूर्तता होत नसल्यानं रसावर GST आकारण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीनं सांगितले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर रस्त्यावरील गाड्यावरील ऊसाच्या रसावर जीएसटी असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, यावर कोणताही GST असणार नाही. . मात्र, हाच ऊसाचा रस जीएसटी क्रमांक धारण करणाऱ्या दुकानातून घेतला तर त्याच्या बिलात जीएसटी अंतर्भाव होऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्सचे ऊसाचा रस विकण्याचे नियोजन
महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं राज्यात साखर आणि गुळाचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं. असे असले तरी ऊसाचा रसही काढला जातो. रस छोट्या छोट्या स्टॉलवर ऊसाच्या रसाची विक्री केली जाते. मात्र, उसाचा रस हे कृषी उत्पादन नाही. त्यामुळं ऊसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. व्यापारी तत्वावर जर ऊसाचा रस विकला जाणार असेल तर त्यावर हा जीएसटी द्यावाच लागेल, असे उत्तर प्रदेशात जीएसटी अॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने म्हटले आहे. ऊसाचा रस हा कृषी उत्पनात मोडत नाही. त्यामुळं जीएसटीसाठी तो पात्र ठरतो. उत्तर प्रदेशातील गोविंद सागर मिल्स या कारखान्याने ऊसाचा रस व्यापारी तत्त्वावर विकण्याचे नियोजन केले होते. त्यामुळं या रसावर जीएसटी लागू होईल का, याची अधिक माहिती घेण्यासाठी जीएसटी ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीकडे संपर्क केला. त्यावेळी ही बाब समोर आली आहे.
कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या अटींची पूर्तात होत नसल्यानं रसावर GST
ऊसाचा रस हा साखर कारखान्यात ऊसाचे गाळप करुन तयार केला जातो. तो शेतकरी तयार करत नाही. तसेच त्याचे स्वरुप आणि प्रक्रियाही बदलते. साखर, इथेनॉल तयार करण्यासाठी तो कच्चा माल ठरतो. त्यामुळं कृषी उत्पादनासाठी लागणाऱ्या तिन्ही अटींची पूर्तता यामध्ये होत नाही. त्यामुळं त्याच्यावर जीएसटी हा द्यावा लागेल असं मत जीएसटी ॲडव्हान्स रुलिंग ॲथॉरिटीनं व्यक्त केलं आहे.