पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिकनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून नावलौकीक मिळवण्यासाठी राष्ट्रीय हॉकीचॅम्पियनशिप स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार असून क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने ११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ चे आयोजन दि. ११ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे करण्यात आले आहे. या निमित्त महापौर ढोरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्या अपर्णा डोके, शारदा बाबर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, हॉकी महाराष्ट्राचे सरचिटणीस मनोज भोरे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ चा उद्घाटन समारंभ महापौर ढोरे यांच्या हस्ते शनिवार दिनांक ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास ना. अजित पवार, मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, पुणे जिल्हा हे प्रमुख अतिथी असून, श्री. लक्ष्मण जगताप, मा. आमदार, श्री. महेश लांडगे, मा. आमदार यांच्या विशेष उपस्थितीत, श्रीम. सुप्रिया सुळे, मा. खासदार, श्री. श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, मा. खासदार, डॉ. श्री. अमोल कोल्हे, मा. खासदार, श्री. संग्राम थोपटे, मा.आमदार, श्री. आण्णा बनसोडे, मा. आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत, श्रीम. नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले, मा. उप महापौर, श्री. नामदेव ढाके, मा.सत्तारूढ पक्षनेता, अॅड. नितीन लांडगे, मा.सभापती, स्थायी समिती, श्री. शरद उर्फ राजू मिसाळ, मा.विरोधी पक्षनेता, श्री.राजेश पाटील, मा.आयुक्त, श्री.कृष्ण प्रकाश, मा.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, श्री.धनराज पिल्ले, पद्मश्री, ब्रँड अँबेसिडर हॉकी महाराष्ट्र या मान्यवरांच्या उपस्थितीत व श्रीम.स्विनल म्हेत्रे, मा.सभापती, विधी समिती, श्रीम.अनुराधा गोरखे, मा.सभापती, शहर सुधारणा समिती, श्रीम. सविता खुळे, मा.सभापती, महिला व बालकल्याण समिती, श्रीम.माधवी राजापुरे, मा.सभापती, शिक्षण समिती, श्रीम.उषा मुंढे, मा.सभापती, जैव विविधता व व्यवस्थापन समिती, श्री.राहुल कलाटे, मा.गटनेता, शिवसेना, श्री.सचिन चिखले, मा.गटनेता, मनसे, श्री.कैलास बारणे, मा.गटनेता, अपक्ष आघाडी व प्रा.उत्तम केंदळे, मा.सभापती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती व मा.सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, श्री.विकास ढाकणे, मा. अतिरिक्त आयुक्त (१), श्रीम. सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त (क्रीडा) तसेच म.न.पा.चे इतर पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न होत आहे.
११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ या स्पर्धेमध्ये होणा-या एकुण ५० सामन्यांमध्ये एकुण ३० राज्यांचे संघांमधील ७५० खेळाडू सहभागी होणार असून, ४० पंच, ८ सिलेक्टर, १० पदाधिकारी व ९० स्वयंसेवक स्पर्धेचे कामकाज पाहणार आहेत.११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ चे आयोजनकामी मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर येथील कायमस्वरूपी लागणा-या सुविधांचा खर्च, स्थापत्य क्रीडा यांचे कडून स्थापत्य विषयक कामाकरिता र.रू.२.७५ कोटी, विद्युत विभाग “ह” क्षेत्रिय कार्यालय यांचे कडून विद्युत विषयक कामांकरीता र.रू.१.८४ कोटी व क्रीडा विभागाकडून खेळाडू व पंच पदाधिकारी यांची वाहतूक व्यवस्था, पी.व्ही.सी फ्सेक्स बॅनर्स छपाई, क्रीडा साहित्य खरेदी इ. कामी र.रू.२१,०४,८५४/- व माहीती व जनसंपर्क विभाग यांचेकडून एल.ई.डी व्यवस्था कऱणे कामी र.रू.११,२१,१२०/- इतका खर्च असा एकुण र.रू.४,९१,२५,९७४/- इतका खर्च येणार आहे.
सदर स्पर्धा अनुषंगाने हॉकी महाराष्ट्र, हॉकी इंडिया व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांचेकडून सुरक्षा व्यवस्था, पंच व खेळाडू निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, इव्हेंट मॅनेजमेंट खर्च, पंच पदाधिकारी यांचे मानधन, प्रवास भत्ता, ट्रॉफीज – मेडल्स व स्पर्धेचे प्रसिद्धी कामी थेट प्रक्षेपण खर्च ई. प्रकारचा खर्च करण्यात येणार आहे. ११ वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ या स्पर्धेकरीता दि.११/१२/२०२१ ते दि.२१/१२/२०२१ या काळात श्री.मनोज भोरे, सर चिटणीस, हॉकी महाराष्ट्र श्री.राजिंदर सिंग, सर चिटणीस, हॉकी इंडिया व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांचे सहकार्य लाभणार आहे.