Wednesday, July 15, 2026
Homeआरोग्यविषयकपिंपरी चिंचवड शहरात आज ११३ जणांना कोरोनाची लागण…

पिंपरी चिंचवड शहरात आज ११३ जणांना कोरोनाची लागण…

पिंपरी चिंचवड शहरात आज दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी ११३ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झालायामध्ये १ पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील १ मनपा हद्दीबाहेरील आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५७२२७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५१०७८ वर पोहोचलीआहे.आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६०९ जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच आज शहरात ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण नाही आढळले.

आजपर्यंत शहरातील एकूण लसीकरण ३३६१०७४ एवढे झाले आहे.

वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्वांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेरपडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणेपालन करावे.

टिप – उपरोक्त माहिती वॉर रुममधील डॅशबोर्डवरील माहिती नुसार तयार करण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments