Monday, October 7, 2024
Homeआरोग्यविषयकमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताचा त्रास झाल्याने 11 जणांचा मृत्यू… मृतांचा आकडा...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताचा त्रास झाल्याने 11 जणांचा मृत्यू… मृतांचा आकडा वाढण्याची भीती

नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या कार्यक्रमादरम्यान तब्बल 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. मृतांमध्ये आठ महिला असून बहुतांश वृद्ध आहेत. हृदयविकाराच्या समस्या आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतार यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी काही रुग्ण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारने सन्मान
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. परंतु या कार्यक्रमसाठी राज्यभरातून आलेला जनसमुदाय हा सकाळी 8 दुपारी 1 वाजेपर्यंत कडक उन्हात बसला होता. पाच ता कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.

महत्त्वाची बाब म्हणजे सेंट्रल पार्कमधील या कार्यक्रमासाठी ठरवलेली वेळ ही उन्हाळ्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रस्तावित केलेल्या उष्मा कृती योजनेच्या विरोधात आहे, असं एका अधिकाऱ्याने निदर्शनास आणून दिलं. तर ठाण्यात रविवारी (16 एप्रिल) वेधशाळेने कमाल 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली.

सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे मृत्यू : सामाजिक कार्यकर्ते
या कार्यक्रमाची व्यवस्था अतिशय खराब होती. राहण्याचीही व्यवस्था योग्य प्रकारे केली नव्हती. त्यातच कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातच्या काही भागातून लोक आले होते. हे लोक आधीच आल्यामुळे ते मैदानातच थांबले. रविवारी दुपारच्या रणरणत्या उन्हात, कोणत्याही संरक्षणाशिवास ते थेट सूर्यप्रकाशात बसले होते, असं खारघरमधील एका रहिवाशाने सांगितलं. तर सरकराच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे मृत्यू झाल्याचा दावा, सामाजित कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी केला आहे.

या कार्यक्रमात वैद्यकीय सेवेसाठी तैनात असलेल्या डॉक्टरांपैकी एकाने सांगितली की, “सुमारे 30 लोकांना उपजिल्हा रुग्णालय-पनवेल, NMMC आणि वाशीमधील फोर्टिस, नेरुळमधील डीवाय पाटील हॉस्पिटल, कामोठे आणि बेलापूर इथल्या एमजीएम रुग्णालय तर खारघरमधील टाटा कॅन्सर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. ते डिहायड्रेशन (निर्जलीकरण), छातीत दुखणे, रक्तातील साखरेची पातळी वाढणे यासह इतर आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. काही लोकांना ओआरएस पावडर देण्यात आली होती. तसंच त्यांना सावलीत किंवा वारा असलेल्या ठिकाणी बसण्यास सांगितले होतं.”

मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची भरपाई
दरम्यान या कार्यक्रमाद मृत पावलेल्या श्री सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली तसंच आजारी असलेल्यांचा उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार असंही जाहीर केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments