Sunday, May 17, 2026
Homeगुन्हेगारीपिंपरी-चिंचवडमधील १० इंग्रजी शाळा अनधिकृत; पालकांनी प्रवेश न घेण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवडमधील १० इंग्रजी शाळा अनधिकृत; पालकांनी प्रवेश न घेण्याचे आवाहन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० खासगी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा शासनाची परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविल्या जात असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये या शाळांना कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याने पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश या शाळांमध्ये करू नये, असे आवाहन महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.

शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळांना यापूर्वीच बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या, तरीही त्या नियमबाह्यपणे सुरू आहेत. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भविष्यातील मान्यतेवर परिणाम होऊ शकतो. या नुकसानीस संबंधित पालक स्वतः जबाबदार राहतील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, परवानगीशिवाय शाळा सुरू ठेवणाऱ्या मुख्याध्यापकांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

अनधिकृत शाळांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. ब्लोमिंग बर्ड्स, ताथवडे

२. लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवडेनगर

३. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी

४. डी. एम. के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी

५. माने इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी

६. नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली

७. माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चऱ्होली

८. हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड

९. कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली फाटा

१०. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी

पालकांनी मुलांच्या शैक्षणिक हितासाठी केवळ शासनमान्य शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments