Tuesday, February 18, 2025
Homeगुन्हेगारीनक्षलवाद्यांचा हल्ला, IED स्फोट घडवला, ११ जवान शहीद, छत्तीसगडमध्ये मोठी घटना

नक्षलवाद्यांचा हल्ला, IED स्फोट घडवला, ११ जवान शहीद, छत्तीसगडमध्ये मोठी घटना

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. आयईडी ब्लास्टमध्ये (IED Blast) तब्बल 11 जवान शहीद झाले आहेत.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरनपूर पोलीस ठाण्यांतर्गत माओवादी कॅडरची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. आज दंतेवाडा येथून नक्षलविरोधी अभियानासाठी डीआरजी दल पाठवण्यात आलं होतं. डीआरजी पथक परतत असताना अरनपूर रस्त्यावर आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात 10 डीआरजी जवान आणि ऑपरेशनमध्ये सहभागी एक ड्रायव्हर शहीद झाला.

नक्षलवाद्यांकडून आयईडी ब्लास्ट…

मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहानांवर आयईडी ब्लास्ट केला. डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्डला गुप्त माहिती मिळाली होती. एका ठिकाणी नक्षलवाद्यी येणार असल्याची माहिती मिळाली होती. तसेच, त्यामध्ये नक्षल्यांचे कमांडरही असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल रवाना करण्यात आलं होतं. त्याचवेळी नक्षलींनी जवानांच्या वाहानांवर आयईडीनं निशाणा साधला. नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये 10 डीआरजीच्या जवानांसह एका ड्रायव्हरचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments