२ नोव्हेंबर
१०, ११, १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे संपन्न होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवींचे लोकप्रिय व्यासपीठ कविकट्टा च्या प्रमुख पदी कवी राजन लाखे यांची नियुक्ती झाली आहे. सलग ४ वर्षे कविकट्टा चे यशस्वी नियोजन करणारे लाखे यांना यंदाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने हा मान दिला आहे. राजन लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष असून व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत.
कविकट्टा साठी नियोजनबद्ध प्रक्रिया राबविण्यासाठी भारतातून कविता मागविणे , त्याची छाननी करून दर्जेदार ४५० ते ५०० कवितांची समिती द्वारे निवड करणे, आणि सलग तीन दिवस चालणाऱ्या कविकट्टा या व्यासपीठावर दिलेल्या वेळेनुसार कवींना आमंत्रित करणे व शिस्तबद्ध पद्धतीने ही पद्धत राबवून कवींना सन्मान प्रदान करणे ही कविकट्टा ची प्रमुख वैशिष्ट्ये असून दरवर्षी कविकट्टा अधिकाधिक कविप्रिय तसेच रसिकप्रिय होत असून
संमेलनात गर्दी खेचत आहे. लाखे यांनी सदर पद्धत विकसित करून कविकट्टा ला नवे वळण दिले आहे.
लाखे यांचेशी संपर्क साधला असता यावर्षी कविकट्टा वरील सर्व कविता फेस बुक लाईव्ह होणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे बाहेरील रसिकांना असेल तेथे कवितांचा आनंद घेता येईल. अधिक वेळ मिळाल्यास ५०० पेक्षा अधिक कवीना समाविष्ट करून घेण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकट्टा प्रमुख पदी कवी राजन लाखे यांची नियुक्ती
RELATED ARTICLES