Friday, September 29, 2023
Homeताजी बातमी५ लाख ५१ हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

५ लाख ५१ हजार दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

२७ आॅक्टोबर
शनिवारी संध्याकाळी शरयू नदीचा किनारा लाखो पणत्यांनी लखलखला.  दिवे लावण्यासाठी ६ हजार विद्यार्थी, २२० प्राध्यापक व व्याख्याते सहभागी झाले होते. दीपोत्सवासाठी अयोध्या आणि फैजाबाद परिसरात तसेच शरयू नदीच्या तीरावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. स्थानिक पोलिसांबरोबरच धडक कृती दल, प्रांतिक सशस्त्र दलाचे जवान तैनात होते. दीपोत्सवासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या मार्गांत अडथळा येऊ नये, यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली . यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आधीची सरकारे अयोध्येत येण्याची भीती बाळगत होती. परंतु मी गेल्या अडीच वर्षात कितीतरी वेळा अयोध्येत आलोय.  केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारताचा जगात सांस्कृतिक सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला आहे. अयोध्येत अशी दिवाळी साजरी करण्यास ७० वर्षे लागली.
दरम्यान काल दिवाळीनिमित्त अयोध्या नगरी ५ लाख ५१ हजार दिव्यांच्या रोषणाईने झगमगून निघाली होती.शनिवारी संध्याकाळी शरयू घाट ते राम पायडीपर्यंत ५ लाखांहून अधिक पणत्या व दिवे लावण्यात होते . त्यामुळे दीपोत्सवासाठी अयोध्या व शेजारील फैजाबाद शहर दिव्यांनी रंगून गेले. यासोबतच अयाेध्येने २०१८ चा ३.५१ लाख दिवे लावण्याचा आपला स्वत:चाच विक्रम माेडला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही याची नोंद झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments