१६ नोव्हेंबर,
५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे पिंपरी-चिंचवड केंद्रावरील स्पर्धेचे उदघाटन अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचे हस्ते झाले.
पिपंरी चिचंवड मधील प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृहात ही स्पर्धा होत आहे. यावेळी सांस्कृतिक संचालनायाच्या दीपाली जपे, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी, किरण येवलेकर, विश्वास देशपांडे व स्पर्धेचे परिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत दि.३ डिसेंबर पर्यंत एकूण २३ नाटके सादर होणार असून जास्तीत जास्त रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
उदघाटनानंतर यशवंतराजे प्रतिष्ठान,पुणे यांचे ‘न येती उत्तरे’ हे नाटक सादर झाले.स्पर्धेचे समन्वयक राजेंद्र बंग व सायली कोल्हटकर आहेत. या स्पर्धेत न येती उत्तरे, अडचण. काळडोह, बी.एल.18, फपडस, अशा-अमर, महासागर, ह्या गोजिरवाण्या गरात, दाह,अखेरची पाककृती, मरे एक त्याचा, पगला घोडा, बालीवध, मास्टर्स, पोंगापंडीत, लीव इन रिलेनशिप, भा. वि. अमृत, द रिटर्न गिफ्ट, काटकोन त्रिकोण, ए सायकॅस्ट्रीस्ट, रात्र 16 जानेवारीची, अचानक,अपुलाची दाद आपणांसी अशा नाटकांचा आस्वाद पिंपरी-चिंचवडकरांना घेता येणार आहे.