Friday, September 29, 2023
Homeताजी बातमी२९ वे बालकुमार साहित्य संमेलन ९ फेब्रुवारीपासून बालेवाडी येथे

२९ वे बालकुमार साहित्य संमेलन ९ फेब्रुवारीपासून बालेवाडी येथे

६ फेब्रुवारी २०२०

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान यांच्यातर्फे ८ व ९ फेब्रुवारी होणाऱ्या २९ व्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनात लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. राज्यभरातील मुले सहभागी होणार असून त्यामध्ये मुलांचे कविसंमेलन आणि कथाकथनाचे विशेष कार्यक्रम होणार आहेत.

बालेवाडी येथील म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयाच्या प्रांगणात हे दोन दिवसीय संमेलन होणार आहे. संमेलनाचा सविस्तर कार्यक्रम नियोजन मंगळवारी साहित्य संस्थेच्या अध्यक्षा संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष गणपतराव बालवडकर यांनी जाहीर केला.

‘प्रसिद्ध लेखक, कवी प्रवीण दवणे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे. पहिल्या दिवशी दुपारी मुलांसाठी ‘हसती, नाचती, खेळती मुले जिथे’ हा विशेष कार्यक्रम सादर होईल. दुसऱ्या दिवशी ‘सुंदर माझी शाळा’ हा बालगीतांचा कार्यक्रम सादर होईल. या संमेलनात पुण्यासह मुंबई, औरंगाबाद, नांदेड, परभणी, संगमनेर, बीड, फलटण, सातारा, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणांहून लहान मुले सहभागी होणार आहेत,’ अशी माहिती संगीता बर्वे यांनी दिली. या दोन दिवसांच्या संमेलनाला आसपासच्या शाळांमधील मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे स्वागताध्यक्ष बालवडकर यांनी सांगितले. 

८ फेब्रुवारी सकाळी ९ ते १० वाजे पर्यंत ग्रंथदिंडी व संमेलनाचे उद्घाटन त्यानंतर २ ते ३;३० वाजता  ‘हसती, नाचती, खेळती मुले जिथे’ कार्यक्रमाचे सादरीकरण,कविसंमेलन असेल. ९ फेब्रुवारी ९ ते १० वाजता संमेलनाध्यक्ष प्रवीण दवणे यांची मुलाखत,ऐका माझी गोष्ट (मुलांचे कथाकथन) आणि त्यानंतर १ ते २ ‘सुंदर माझी शाळा’ बालगीतांचा कार्यक्रम आणि पुस्तक प्रकाशन व संमेलनाचा समारोप होईल.

साहित्य संमेलनाप्रमाणेच बालकुमार संमेलनातून नव्या पिढीचे वाचक घडविण्याचे काम होत आहे. केवळ संमेलनापुरतेच बालवाचक घडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ‘लेखक तुमच्या भेटीला’, ‘कविता फुलते कशी?’, ‘काय वाचावे? का वाचावे?’ अशा कार्यक्रमांतून बालसंमेलनाचा कार्यकर्ता म्हणून वर्षभर मुलांमध्ये रमण्याचा माझा प्रयत्न असेल. असेल प्रवीण दवणे म्हणाले.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments