५ डिसेंबर
‘साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित १९ वे साहित्यिक कलावंत संमेलन २८ व २९ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य, लोककला आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक, प्रवचनकार डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे,’ अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि. दा. पिंगळे यांनी कळविली आहे.
देखणे यांनी संशोधनात्मक आणि चिंतनात्मक अशा ४७ पुस्तकांचे लेखन केले आहे. संत एकनाथांच्या भारूडांवर आधारित ‘बहुरुपी भारूड’ या कार्यक्रमाचे एकवीसशेहून अधिक प्रयोग केले आहेत. यापूर्वी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. आनंद यादव, प्रा. रा. ग. जाधव, उत्तम कांबळे, नारायण सुर्वे, डॉ. यशवंत मनोहर, फ. मुं. शिंदे, रामदास फुटाणे आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.