३१ आॅक्टोबर,
दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर दिग्दर्शक अभिनेता प्रसाद ओकने आईच्या धैर्याची गोष्ट सांगणारा ‘हिरकणी’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे कधी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि बघायला जातोय अशी भावना अनेकांची होती. ‘हिरकणी’ चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी इतकी गर्दी केली की चित्रपटाच्या तिकीटगृहावर हाऊसफुलची पाटी झळकली.
‘हिरकणी’ ज्या आठवड्यात प्रदर्शित झाला त्या आठवड्यात मराठी आणि हिंदी असे एकूण पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनसाठी पाच चित्रपटांची मेजवानी मिळाली. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला प्राधान्य दिले. ‘हिरकणी’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आणि लगेच काही दिवसांत, महाराष्ट्रभरात सोमवारी १५० आणि मंगळवारी सुद्धा १५० पेक्षा जास्त शोज हाऊसफुल झाले. इतकेच नव्हे तर एका दिवसात ७० पेक्षा जास्त शोज वाढले आणि महाराष्ट्रात अनेक थिएटर्सदेखील वाढले आहेत. काही ठिकाणी हाऊसफुल्ल चे बोर्ड पण लागले,
एंकदरीत मराठी हिरकणी हिंदी “हाऊसफुल्ल -४” वर भारी पडल्यासारखे वाटतेंय.
‘हिरकणी’ पडली भारी! तिकीटबारीवर सोनालीची हिरकणी ‘हाऊसफुल’
RELATED ARTICLES