Friday, September 20, 2024
Homeताजी बातमीहिंगणघाट जळीत प्रकरणाने राज्यात संतापाची लाट

हिंगणघाट जळीत प्रकरणाने राज्यात संतापाची लाट

४ फेब्रुवारी २०२०

हिंगणघाटा पासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावरील दारोडा गावात राहणाऱ्या या कुटुंबातील ही तरुणी. मुलगी हुशार. त्यामुळे तिचे वडील अरुण आणि आई संगीता यांनी तिच्या शिक्षणाची अबाळ होऊ नये म्हणून मुलीला आठवीनंतर हिंगणघाटच्या शाळेत प्रवेश दिला. असेच शिकत तिने हिंगणघाटच्या बिडकर कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. तेथून बीएससीचे पदवी शिक्षण घेतल्यानंतर ती वर्धेच्या जे. बी. सायन्स कॉलेजमध्ये एमएससीसाठी दाखल झाली. जाचक महाविद्यालयातून बी. एड.चे शिक्षण घेत असलेल्या या कन्यारत्नाने आपल्या हिमतीवर बॉटनी हा विषय शिकविण्यासाठी तासिका तत्वावर कॉलेजमध्ये प्राध्यापकपदावर काम सुरू केले. मात्र इथेच तिचा घात झाला.

तिच्या मागावर असलेल्या एका माथेफिरूने सोमवारी तिला कॉलेजकडे जात असताना सकाळी सातच्या सुमारास नांदुरी चौकात गाठले आणि तिच्यावर पेट्रोल फेकत आग लावली.

चार महिन्यांपूर्वी मुलीने हा तरुण त्रास देतो, हे सांगितले होते. मी त्याला समजावलेही होते. यानंतर पुन्हा असे वागणार नाही, असेही तो म्हणाला होता. मात्र त्याच वेळी जर पोलिसांत तक्रार दिली असती तर आज ही वेळ आणि असा दिवस पाहण्याची वेळच आली नसती, अशी हतबलता शिक्षिकेच्या पालकांनी व्यक्त केली. घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून हे कृत्य करणाऱ्या त्या नराधमालाही पेट्रोल टाकून जाळा अशी मागणी तिच्या आईने केलीय. सरकारने पीडितेला मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.

दरोडा गावात राहणाऱ्या नागरिकांनी आज ह्या घटनेवरती निषेध म्हणून मोर्चा काढला. त्यावेळी संतप्त महिलांनी त्या नराधमाला आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्याला आमच्याकडे सोपवा आम्ही त्याला शिक्षा देतो अशी मागणी या महिलांनी केलीय.

काल झालेल्या घटनेत ती प्राध्यापिका 40 टक्के भाजली होती. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. श्वासनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतोय.

 खासदार नवनित राणी ह्यांना हा मुद्दा आज लोकसभेत पण उपस्थित केला आहे. दरम्यान काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments