१९ नोव्हेंबर
छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित अजय देवगण यांच्या कारकिर्दीतील १०० वा बहुचर्चीत चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्कंठा ताणली गेली होती. हा ट्रेलर प्रसिध्द झाल्या नंतर अवघ्या काही तासात लाखो लोकांनी पंसती दिली असून,
“हर मराठा पागल है स्वराज का ..शिवाजी राजे का, भगवे का..” ” एक मराठा.. लाख मराठा ”
हे डायलॉग अक्षरशः अंगावर काटा आणतात.
#TanhajiTheUnsungWarrior #AjayDevgn #SaifAliKhan
‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल झळकणार आहे. या खेरीज शरद केळकर, पद्मावती राव, सैफ अली खान, अजिंक्य देव, देवदत्त नागे हे कलाकारही यात विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.