१५ नोव्हेंबर,
लघुचित्रपट हे माध्यम दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून, लघुचित्रपटाद्वारे आपल्यासभोताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या माध्यमातून आपण सर्वासमोर मांडू शकतो, याला अनुसरूनच मागील २ वर्षांच्या यशस्वी आयोजनंतर ह्या वर्षी ३ रा अण्णा भाऊ साठे आंतरराष्टीय लघुचित्रपटाचे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक १६ आणि १७ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, लॉ कॉलेज रोड पुणे येथे पार पडत आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे उत्तम कलावंत होते, शोषित व वंचितांना त्यांनी साहित्यात मानाचे स्थान दिले, अण्णा भाऊ साठे शाहीर, साहित्यिक, कलावंत, दिग्दर्शक अशा विविध भूमिका पार पाडणारे अष्टपैलू व्यतिमत्व होते. मराठीत चित्रपट सष्टीत अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यावर एकूण ७ चित्रपट निघाले आहेत.
या वर्षी या महोत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेत्री ज्योतीताई सुभाष यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या वर्षी या महोत्सवाचे परीक्षक म्हणून दिग्दर्शक उमेश कुलकर्णी व सुनील सुकथनकर हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक काम पाहत आहेत तर, पारितोषिक वितरण समारंभास अभिनेत्री ज्योतीताई सुभाष, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी,सुनील सुकथनकर आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवादरम्यान ” हमीद दलवाई ” यांच्यावरील माहितीपटावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महोत्सवाचे आयोजक सचिन बागडे यांनी दिली. या महोत्सवाचे दिग्दर्शक संदीप ससाणे हे आहेत.