२३ ऑक्टोबर
माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज (बुधवार) अधिकृतपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या बरोबरच सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली मंडळाचे कामकाज पाहणाऱ्या प्रशासकांच्या समितीचा (CoA) कार्यकाल देखील संपुष्टात आलेला आहे
सौरव गांगुलीला अवघ्या १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. गांगुलीला प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनची धुराही त्यानं यशस्वीरित्या सांभाळली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासाकीय समितीमुळं क्रिकेटची घडी विस्कटल्याचा अनेकांचा आरोप आहे. ही घडी पुन्हा बसविण्यासाठी गांगुलीसारखा प्रशासक हवा, असं अनेकांचं मत होतं. त्यातूनच त्याचं नाव पुढं आल्याचं सूत्रांकडून समजतं.
सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
RELATED ARTICLES


