२१ ऑक्टोबर २०१९
सेलेब्रेटींनीही आपले सामाजिक भान जपत आणि मतदानाचे महत्व समजून घेऊन मतदानाला उपस्थिती नोंदवली. ‘हिरकणी’ या चित्रपटाच्या प्रमोशन मधून वेळात वेळ काढून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेसुद्धा निगडीत उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो अंगीकारून आपण मतदान केले पाहिजे असे आव्हान सोनालीने केले. मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतोय!!!!. मतदानानिमित्त आज सुट्टी आहे तर सुट्टीचा आनंद उपभोगुया हे विचार म्हणजे कुठेनाकुठे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रेमाने एका एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
सोनालीनेही बजावला मतदानाचा अधिकार
RELATED ARTICLES