९ डिसेंबर
डॉक्टर अभिजित देशपांडे Bright Dental Foundation हे फूल माऊथ डेंटल इंप्लांट सर्जरी करतात. हि अत्याधुनिक पद्धत असून दात नसलेल्या व्यक्तीसाठी जे कवळी वापरू शकत नाहीत अशासाठी हे वरदान आहे.डेंटल इंनप्लांट च्या सहाय्याने कायमस्वरूपी दात बसवले जातात व ते आपल्या नैसर्गिक दांताप्रमाणे काम करतात त्यांची अन्न चावण्याची क्षमता कवळी पेक्षा जास्त आहे. या दातांनी सर्व प्रकारचे अन्न खाता येते,त्यामुळे पचन क्रिया चांगली होते व आजार टाळता येतात. दात कायमस्वरूपी असल्यामुळे शब्दोच्चार स्पष्ट होतात तसेच दातांचे नैसर्गिक सौदंर्यही अबाधित राहते.
डेंटल इंनप्लांट म्हणजे काय ?
तर दातांची मुळे ज्याप्रमाणे हिरडीत पक्की रुजवलेली असतात त्याप्रमाणे टायटॅनियम धातूचा एक स्क्रू हिरडीत व हाडात बसवला जातो व त्यावर सिरामिक चा नकली दात बसवला जातो या दोन्ही घटकांना एकत्रितपणे इम्प्लांट दात असे म्हणतात.हि शस्त्रक्रिया अतिशय सोपी व वेदनाविरहित आहे. लोकल अनेस्थेशिया देऊन हि शस्त्रक्रिया केली जाते.शस्त्रक्रियेनंतर रुग्णास कोणत्याही प्रकारच्या वेदना अथवा त्रास होत नाही शस्त्रक्रियेनंतर तो लगेच घरी जाऊ शकतो.ज्यांना फक्त एखाद दुसऱ्या दातांसाठी हि शस्त्रक्रिया करून घ्यावयाची आहे, त्यांच्यासाठी हि सोय उपलब्ध आहे.
Digital Dental Implants Technology
हि शस्त्रक्रिया डिजिटल पद्धतीने हि केली जाते त्याची थोडक्यात माहिती याप्रमाणे आहे. इम्प्लांट स्क्रू ज्या हाडात बसवायचा आहे त्या हाडाची लांबी रुंदी व उंची किती आहे.हे हाड मजबूत आहे कि ठिसूळ आहे. हाडांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या व नसा कुठे आहेत, ज्या छिद्रातून नसा दातांपर्यंत जाण्यासाठी हाडातून बाहेर पडतात ती छिद्रे कुठे आहेत, जबडयामध्ये असणारी महत्वाची नस व त्या नसेचा कॅनाल किती खोल आहे,त्याचप्रमाणे मॅकझिलरी सायनसचा तळ वरच्या जबडयाच्या हाडांमध्ये कुठे आहे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते या सर्व गोष्टीचा सखोल अभ्यास करण्यासाठी CBCT स्कॅन नावाची चाचणी केली जाते. या चाचणीचा रिपोर्ट व CAD -CAM इनप्लांट सॉफ्टवेअरच्या सहाय्याने रुग्णाचे दात कसे बसवता येतील याची योजना सर्जरी पूर्वी केली जाते. त्यासाठी दात कॅडकॅम मिलिंग मशीनद्वारे अगोदरच तयार केले जातात. इनप्लांट्स स्क्रू हाडात योग्यप्रकारे रोपण करण्यासाठी गायडेड स्टेण्ट तयार केला जातो. संपूर्ण योजना तयार झाल्यावर लोकल अनेस्थेशिया देऊन सर्जिकल गाईडेड स्टेन्ड द्वारे इनप्लांट स्क्रू हाडात रोवला जातो.हि सर्जरी वेदनारहित असते व टाके घालण्याची आवश्यकता नसते.डिजिटल इनप्लांट सर्जरी सोपी आहे व कमी वेळत होते.कॉम्पुटरच्या सहाय्याने अगोदरच दात तयार केलेले असल्यामुळे त्याच दिवशी दातही बसवता येतात.
डिजिटल डेंटल इनप्लांट सर्जरी चे फायदे …
CBCT स्कॅन मुळे इनप्लांट स्क्रू आणि दात अचूक पद्धतीने तयार केले जातात.
गायडेड स्टेन्ट मुळे स्क्रू फिक्स करताना महत्वाच्या नसा रक्तवाहिन्या आणि सायनस याला कोणताही धोका नसतो अथवा तो टाळता येतो.
बऱ्याचदा ऑपरेशन नंतर टाके घालावे लागत नाहीत हि सर्जरी वेदनारहित असते व कमी वेळात होते.
पहिल्याच दिवशी दात फिक्स बसवता येतात.
सर्जरीनंतर होणार त्रास आणि सूज कमी असते.
रुग्णाला आपले दात कसे असतील हे सर्जरीच्या अगोदर बघता येते त्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो.
या सर्जरी मध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्पलिकेशन चे प्रमाण खूप कमी असते.
DR. A B H I J I T D E S H P A N D E – Bright Dental Foundation
Master in Dental Surgery
Specialization in Oral Surgery
Implant Dentistry and Periodontics
Mob. 9823234778
http://brightdentalclinics.com