पिंपरी । ऑक्टोबर १५,२०१९
मोशी येथील शासकीय गायरान जागेवर आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून सेंटोसा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक वसंत लोंढे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे केले.
यावेळी लोंढे म्हणाले, ” आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे सफारी पार्क व्हावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यास मान्यता दिली असून पार्कसाठी सुमारे १५०० तर १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून एक हजार कोटींचा निधी पर्यटन विभाग माध्यमातून केला जाणार आहे. उर्वरित निधी पिंपरी चिंचवड महापालिका उभारणार असून तीन वर्षात हे सफारी पार्क साकारणार आहे .”
देशात हा प्रकल्प राबवणारे पिंपरी चिंचवड हे पहिले शहर म्हणून जगाच्या पाठीवर ओळखले जाईल. परिणामी समाविष्ट गावांचा कायापालट होणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील आणि शहरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरेल.
सिंगापूरच्या धर्तीवर सफारी पार्क आता मोशीत ….!
RELATED ARTICLES