१६ ऑक्टोबर २०१९
श्री छत्रपती संभाजी मित्र मंडळाकडून नुकत्याच आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेत एन्झेल डान्स अकादमीला प्रथम पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेसाठी जय मोबाइल स्टोअर यांच्या वतीने विजेत्यांसाठी एलसीडी, टीव्ही, स्मार्ट फोन आणि आकर्षक ट्रॉफी असे बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. तसेच श्री स्वामी समर्थ फोटोग्राफी यांच्या वतीने सर्व स्पर्धकांना ऑफर व्हाउचर्स दिले.
या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या स्पर्धेमध्ये पुणे शहर आणि इतर गावांतील स्पर्धकांनी कार्यक्रमास हजेरी लावली. मंडळाचे कार्यकर्ते शैलेश वड्डे, गणेश बिरादार, जितू भांडेकर, प्रशांत घाडगे, संचिता गारुळे, स्वानंदी वड्डे, गजानन शेरेकर, किशोर आमले, श्रीराम शिंदे, मयूर जगताप, सचिन जगताप, विपुल मित्तल यांनी स्पर्धेचे उत्कृष्टरित्या आयोजन आणि मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन श्री. आकाश भागवत यांनी केले.