२१ नोव्हेंबर
बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स १८१ अंकांनी वधारत ४० हजार ६५१.६४ अंकावर बंद झाला. तर,निफ्टी ५९ अंकांनी वधारत ११ हजार ९९९ अंकावर बंद झाला. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजीचे वातावरण कायम राहिले.
बुधवार दिवसअखेर रिलायन्सच्या शेअर भावात २.५३ टक्क्यांनी वाढ होऊन तो १५४८ रुपये असा दर होता.रिलायन्सला आतापर्यंत मिळालेला हा सर्वोत्तम शेअर दर आहे. या तेजीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल ९,९०,३६६.८० कोटी रुपयांपर्यंत पोहचला.कोणत्याही लिस्टेड कंपनीचे भांडवल इतक्या रक्कमेवर पहिल्यांदा पोहचले. रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर टीसीएस आणि एचडीएफसी बँकेचा क्रमांक येतो.मात्र, या दोन्ही कंपनींनी बाजार भांडवलाचा ९ लाख कोटींचा टप्पा गाठला नाही. बाजार सुरू होताच येस बँकेचा शेअर दरात वाढ झाली. बाजार बंद होईपर्यंत येस बँकेच्या शेअर दरात २.६५ टक्के वाढ होऊन ६५.८५ अंकांवर बंद झाला.
केरळमधील सीएसबी बँकेने आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. या आयपीओत ४१० कोटी रुपयांपर्यंतचे शेअर विकण्यात येणार आहेत. आयपीओद्वारे विक्री करण्यात येणाऱ्या शेअरचे मूल्य १९३-१९५ रुपये असणार आहे. हे आयपीओ २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान उपलब्ध असणार आहे.