२६ ऑक्टोबर
पुढील काळात शिवसेनेची भूमिका काय असावी यासंदर्भातील सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या एका बैठकीचं आयोजन आज मातोश्री येथे करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीदरम्यान सत्तास्थापनेचं सूत्र भाजपानं लेखी स्वरूपात द्यावं, अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच सत्तेचं समसमान वाटप करण्यात यावं, अशी मागणीही आमदारांनी केली. तसंच सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील,असंही बैठकीत ठरवण्यात आलं.
याअगोदर आमची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही ५०-५० टक्क्यांच्या फॉर्म्युलावर चर्चा केली होती. तसंच राज्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यावरही चर्चा करण्यात आली होती. आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समसमान वाटा महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्रीपद हे आमच्यासाठी दुय्यम आहे. सत्तास्थापनेचं सूत्र भाजपानं लेखी स्वरूपात दिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दिली. आता सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील. असे हि ते म्हणाले.
शिवसेनेला हवाय सत्तेतील समान वाटा आमदारांची एकमुखी मागणी
RELATED ARTICLES