३१ ऑक्टोबर
शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठीची मुंबईत आज बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव सुचवलं. त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं.शिंदे हे सेनेत महत्त्वाचे आणि ताकदीचे नेते मानले जातात. त्यांच्याकडे मावळत्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खातं होतं. याशिवाय सुनील प्रभु यांची विधानसभेतल्या प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याच्या शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यांचा गटनेते पदाचा अनुभव, राजकीय अभ्यास, पक्षातलं स्थान लक्षात घेऊन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड
RELATED ARTICLES