२८आॅक्टोबर,
शिवसेना नेते दिवाकर रावते सकाळी 10.30 वाजता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत. दोन्ही भेटी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्यातरी सध्या सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांकडून सुरु असलेल्या रस्सीखेचीदरम्यान ही भेट महत्त्वाची ठरत आहे.
शिवसेना-भाजप गेल्या पाच वर्षांपासून एकत्र सरकार चालवत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना एकत्रित भेटणे अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटींतून एकप्रकारे सत्तास्थापनेचे संकेत दिले जात आहेत.
शिवसेना-भाजपचे नेते स्वतंत्र राज्यपालांना भेटणार, सत्तास्थापनेच्या राजकीय हालचालींना वेग
RELATED ARTICLES