१ नोव्हेंबर
शासनाच्या संकेतस्थळाद्वारे शिक्षकांच्या १२ हजार रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी ८७ हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत भरती प्रक्रियेत आरक्षणासारख्या तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्या अडचणी दूर करण्यात काही काळ गेला. तसेच आधी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे भरती प्रक्रिया राबवण्यात अडथळे निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पदांवर मुलाखतीविना ५ हजार ८२२ उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. मात्र, मुलाखत घेऊन भरल्या जाणाऱ्या पदांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
राज्यात फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत एक टप्प्यातील जागा भरण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित जागा भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, आता शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून डिसेंबरचे २०१९ उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शिक्षक भरतीसाठी आता डिसेंबरचे २०१९ चे उद्दिष्ट
RELATED ARTICLES