२१ ऑक्टोबर २०१९
पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीनही मतदारसंघातील मतदानाच्या सरासरी टक्केवारीत वाढ झाली आहे. चिंचवड मतदारसंघातील सरासरी टक्केवारी हि २६. ४१ टक्के असून पिंपरी मतदारसंघातील सरासरी टक्केवारी हि २१.६९ टक्के एवढी आहे. पिंपरी संघातील मतदान केंद्रावर सुमारे ४५,७३० स्त्रियांनी तर ३०,९६४ पुरुषांनी मतदान केले. तर भोसरी मतदारसंघात सुमारे ४६,३१३ स्त्रियांनी तर ७०,६८८ पुरुषांनी मतदान केले. हळूहळू मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र उमेदवारांचे लक्ष हे २४ ऑक्टोबर ला होणाऱ्या निकालाकडे लागले आहे.
शहरातील दुपारी एक वाजेपर्यंतची मतदानाची सरासरी टक्केवारी- चिंचवड (२६. ४१ टक्के), भोसरी (२६.५२ टक्के ) आणि पिंपरी (२१.६९ टक्के)
RELATED ARTICLES