Saturday, September 30, 2023
Homeउद्योगजगतशहरातील कमर्शिअल पाणीवापर व वाशिंग सेंटर चालकांना महापालिका बसवणार चाप

शहरातील कमर्शिअल पाणीवापर व वाशिंग सेंटर चालकांना महापालिका बसवणार चाप

२० नोव्हेंबर
पिंपरी चिंचवड शहरवाशीयांसाठी समन्यायी पाणीवाटप करणेकरीता महापौर राहूल जाधव यांचे अध्यक्षतेखाली आयुक्त यांचे दालनामध्ये बैठक आयोजित करणेत आली होती. आयुक्त यांनी निमत्रित केलेल्या या बैठकीमध्ये सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रविण लडकत, रविंद्र पवार, संदेश चव्हाण, दत्तात्रय रामुगडे आदी उपस्थित होते.

आयुक्त यांचे दालनात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आयुक्त यांनी समन्यायी पाणी वाटपाबाबत घ्यावयाच्या धोरणांबाबत व करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहरासाठी सद्यस्थितीत ५०० mld पाणी उचलण्यात येत असून शहरामध्ये समन्यायी पाणी वाटप करण्यासाठी JNURM अंतर्गत २४x७ पाणीपुरवठा योजना तसेच अमृत योजनेंतर्गत वितरण व्यवस्था मजबूत करणे, सर्व नळजोड बदलणे, आवश्यक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधणे ही कामे सुरू आहेत. २४x७ योजना तसेच अमृत योजना पुर्ण होईपर्यंत तसेच वाढती लोकसंख्या, गळती या सर्व बाबींचा विचार करून सोमवार दि. २५/११/२०१९ पासून प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून दरम्यान, एक दिवसआड पाणीपुरवठ्याच्या कालावधीत पाण्याच्या दाबामध्ये वाढ होत असल्याने तक्रारींचे प्रमाण कमी होणार आहे.

Commercial पाणीवापर, Washing Centers इ. चे अनाधिकृत नळजोड शोधून तोडण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या प्रत्येक Division मार्फत तपासणी पथक स्थापन करून एक महिन्यात सदर अनाधिकृत नळजोड शोधून तोडण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. पाण्याच्या उपलब्धतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रथमतः चिखली येथे १०० mld क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यासाठी कामाचे आदेश देण्यात आलेले आहेत. देहू बंधा-यापासून चिखलीपर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठीची निविदा प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. देहू बंधा-याजवळील हेड वर्क्सच्या कामाची निविदा पुन्हा मागविण्यात येत आहे. तसेच, भामा आसखेड धरणातून पाणी आणणेच्या कामाची निविदाही लवकरच काढण्यात येणार आहे. तसेच, रावेत बंधा-यातून वाढीव पाणी उचलण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक कामांची शक्यता पडताळून कार्यवाही करणेचे नियोजन आहे. पवना थेट पाईपलाईनचे काम पुनश्चः सुरू करून दोन वर्षात पुर्ण केल्यास पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. तसेच आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणारे पाणी वितरण करण्यासाठी आवश्यक मुख्य जलवाहिन्या,पाण्याच्या टाक्या इ. कामांचा, रक्कम रू. २३७ कोटीचा Detailed Project Report (DPR) तयार असून नजिकच्या भविष्यात निविदा काढण्यात येत आहेत. आर्थिक नियोजनासाठी प्रसंगी Municipal Bond काढण्याचे नियोजन आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments