२४ आॅक्टोबर
कमालीची उत्सुकता लागलेला मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी एकतर्फी सर केला.
त्यांनी ९३ हजार ६१२ मतांची आघाडी घेत भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा दारुण पराभव केला.
सुनील शेळके यांना एकूण एक लाख ६७ हजार १४१ मते मिळाली. प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार बाळा भेगडे यांना केवळ ७३ हजार ५२९ मते मिळाली. मावळ विधानसभा मतदारसंघात यावेळी ३ लाख ४८ हजार ४६२ मतदार होते. त्यापैकी दोन लाख ४७ हजार ९६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. इतर पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
शरद पवारांनी दिलेल्या संधीचे सोने, मावळ मतदार संघातून सुनील शेळके यांचा मोठा विजय
RELATED ARTICLES