राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज बार्शी येथे आले होते. यावेळी शरद पवार यांनी भाजप – शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनतर पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचाही समाचार घेतला. विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,’ असं वक्तव्य फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केलं होतं
यावर बोलताना ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही, असे पवार म्हणाले. हे वाक्य बोलताना पवार यांनी काही आक्षेपार्ह हातवारे केले. हे हातवारे चित्रीकरणात दिसून आले. यानंतर पवारांचे हे हातवारे सोशल मिडीयावर चांगलेचं ट्रोल झाले.
निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे.
त्यामुळे जाहीरसभांमधून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवताना दिसत आहेत. या निवडणुकीत मजा येत नाही. कारण समोर कुस्ती लढायलाचं कोणी नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बार्शी येथील सभेत पवारांनी चक्क हातवारे करून फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांचे आक्षेपार्ह हातवारे, फडणविसांना दिले उत्तर
RELATED ARTICLES