४ नोव्हेंबर
पिंपरी चिंचवड शहरात यावर्षी प्रथमच इंद्रायणी व पवना नदीकिनारी अनेक घाटांवर उत्तर भारतीयांचा छट उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. शनिवार व रविवार या उत्सवात हजारो उत्तरभारतीय कुटुंबांनी भक्तिभावाने सुर्योपासना केली. विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी इंद्रायणी घाटावर रविवारी (दि. 3) छटउत्सव संपल्यानंतर दुपारी घाट परिसरात साचलेले निर्माल्य साफ व इतर साहित्य साफ करून घाट परिसर चकाचक केला. सण उत्सव साजरे करीत असताना स्वच्छतेबाबतही नागरिकांनी तत्परता दाखवली पाहिजे. या उद्देशाने विश्व श्रीराम सेनेने सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
इंद्रायणी घाटावर मोशी टोल नाक्याजवळ विश्व श्रीराम सेनेच्या वतीने भव्य गंगा आरती व छटपूजा उत्सव साजरा करण्यात आला. विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या उपस्थितीत नदी घाट परिसर स्वच्छ करण्यात आला. जमलेले निर्माल्य, पूजा साहित्य, विटा एकत्रित करून ते ट्रकमध्ये भरले.
यावेळी संस्थेचे सल्लागार सुभाष माछरे, श्यामबाबू गुप्ता, विनोद प्रसाद, मुन्ना सिंग, उमेश सिंह, किरण गायकवाड, पृथ्वी प्रसाद, ब्रिजेश प्रजापती, रोहित प्रसाद, विकास गुप्ता, आणि विश्राम श्रीराम सेनेचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, राहुल गुप्ता, प्रकाश कांबळे, विवेक भुजबळ, पप्पू गुप्ता, विक्रम मीना, आनंद गुप्ता, इम्तियाज शेख यांनी स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.
विश्व श्रीराम सेनेने निभावले सामाजिक उत्तरदायित्व छटपूजेनंतर मोशीतील इंद्रायणी घाट चकाचक
RELATED ARTICLES