1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा लेखक-पत्रकार ग. त्र्यं. माडखोलकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला, की नव्यानं निर्माण होणारं हे राज्य मराठी राज्य असेल की मराठ्यांचं राज्य असेल?
यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळी माडखोलकरांना उत्तर दिले होतं, की हे राज्य मराठी माणसाचंच असेल. त्यावेळी विचारलेल्या या प्रश्नाभोवतीच आजही महाराष्ट्राचं राजकारण फिरत आहे.