निवडणुकांच्या तोंडावर भाजप काश्मीरच्या मुद्द्यावर राज्यांमध्ये बोलत आहे असा आरोप होत आहे. हा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरच्या अध्यक्ष शिवानी दानी यांनी फेटाळून लावला.
निवडणुका आहेत म्हणून आम्ही 370 चे कार्यक्रम करत नाहीयेत. ते आधीच ठरलेलं होतं. ते आम्हाला साध्य करता आलं. योगायोगानं निवडणुका आल्या आहेत. आम्ही विकासाची कामं करत आहोत, असं मत भाजपच्या शिवानी दानी यांनी व्यक्त केलं.
कलम 370 हा राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे. पण आज आपल्या बरेच प्रश्न भेडसावत आहेत असं मत काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं.
“काँग्रेसच्या दृष्टीने या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा आहे. कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची दुरावस्था आहे. हे प्रश्न राष्ट्रवादाच्या प्रश्नामुळे डायव्हर्ट होतो. आज बेरोजगारी, बलात्कार, अ्याचार आदी मुदद्यावर आपण दूर चाललो आहोत. 370 मुद्दा आहेच. पण आपण विदर्भात राहतो. विदर्भाच्या मुद्द्यावर जनतेने भाजपाला निवडून दिलं. पण हे लोक आता विसरून गेले,” असं काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.
तर पीकविमा घोटाळ्याचीही ईडीमार्फत चौकशी व्हावी
काँग्रेस हा लढणारा पक्ष आहे आणि आमच्या पद्धतीने प्रचार करत आहोत असं काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सध्या शरद पवार यांचं ईडीच्या तक्रारीत नाव आलं आहे. ‘जर पवारांची चौकशी होणार असेल तर पीकविमा घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक जे घोटाळे आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी,’ असं ठाकूर म्हणाल्या.