Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीविधानसभा निवडणुकीसाठी ४४११ अधिकारी कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त

विधानसभा निवडणुकीसाठी ४४११ अधिकारी कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त

१९ ऑक्टोबर २०१९
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पिंपरी,चिंचवड, भोसरी, मावळ, खडकवासला,भोर,वडगावशेरी व खेड-आळंदी या आठ विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ४१७ मतदान केंद्रे व १७१६ बुथवर मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान संपूर्ण राज्यात सोमवारी (दि.२१) होत असून कडेकोट बंदोबस्तासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय सज्ज झाले आहे.आयुक्तालयातील एकूण तीन पोलीस, तीन उपायुक्त,सात सहाय्यक आयुक्त,५० निरीक्षक,२१४ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक व २४५० इतके पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत. तसेच पोलीस महासंचालकांकडून बंदोबस्ताची दोन पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, आठ सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी, १० निरीक्षक, २५ सहाय्यक निरिक्षक, ४४२ कर्मचारी, ८०० होमगार्ड तसेच अधिक ४०० होमगार्ड कर्नाटक राज्याकडून उपलब्ध झाले आहेत. अशा रीतीने सुमारे ४४११ अधिकारी व कर्मचाऱयांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस आयुक्त बिष्णोई म्हणाले कि, “सीएपीएफ व आरपीएफच्या प्रत्येकी दोन कंपनी बंदोबस्तासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. मतदान केंद्र व बूथ या ठिकाणी ९९४ पोलीस कर्मचारी व ९६२ होमगार्ड नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ईव्हीएम वाटप केंद्र ४, स्टँगरूम, संवेनशील मतदान केंद्र, सीपीएफ डेव्हलपमेंट, महसुली सेक्टर १६९, पोलीस सेक्टर ६३, वरिष्ठ अधिकाऱ्यासोबतचा बंदोबस्त, नियंत्रण कक्षा स्ट्रायकिंग फोर्स -२, चेक पोस्ट -१२, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम-३९, फ्लाईंग स्क्वॉड-३९ असा बंदोबस्त नियोजीत केला आहे. निवडणूक आयोगाच्या परिणामानुसार आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ४० बूथ संवेदनशील असून तळेगाव दाभाडेतील बूथ अति संवेदनशील आहे. या बुथवर सीपीएफचे हाफ सेक्शन नेमण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदान कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या करीता तात्काळ कारवाईसाठी गुन्हे शाखेची सात विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.आगामी विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी त्या अनुषंगाने आयुक्तालय हद्दीतील क्रियाशील गुन्हेगार,तडीपार गुन्हेगार यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
२१ सप्टेंबर पासून आजतागायत केलेली कारवाई पुढील प्रमाणे-
आरोपी अटक- ४४, फरारी आरोपी अटक- ०३, एमपीडीए कारवाई- ०२, मोका कारवाई-०२, अमली पदार्थ- ०५( जप्त मुद्देमाल – ८,९७,९५०), आर्म ऍक्ट- २२ (जप्त हत्यारे २८), प्रोहिबिशन -२९५(जप्त माळ ५४,८७,५१४),
हत्यारे जमा- ८४० पैकी ८०९.
आयुक्त बिष्णोई म्हणाले की, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत स्थानिक पोलीस बळ व सीपीएफ, एसआरपीएफ यांच्यासह एकूण २४ रूट मार्च घेण्यात आले. विविध गुन्हेगारी वस्त्यांमध्ये ४२ कोंबिंग ऑपेरेशन राबविण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments