२२ ऑक्टोबर २०१९
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या एमएसइडीसीएल च्या मीटरिंग किऑस्क मध्ये आज बिघाड झाल्याने रावेत येथील पम्पिंग यंत्रणा बंद पडली आहे. परिणामी पूर्ण शहराचा दुपारपासून आणि सायंकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील तसेच उद्याचा पाणी पुरवठाही विस्कळीत राहील, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने दिली. तरी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. एमएसइडीसीएल कडून दुरुस्ती झाल्यावर लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरु केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आव्हान पाणी पुरवठा विभागाने केले.
विद्युत पुरवठा यंत्रणेमध्ये बिघाड – शहराचा पाणीपुरवठा आज राहणार विस्कळीत
RELATED ARTICLES