२६ ऑक्टोबर,
वाहतूक नियम पाळणारया वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी कुपन भेट देण्याची योजना पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून “आभार कुपन भेट” योजना राबविण्यात येत आहे. नियम पाळणारे वाहनचालक तसेच ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड नाही, अशा वाहनचालकांना पोलिसांकडून हे कुपन भेट देण्यात येते. वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या शहरातील नामवंत व्यावसायिकांच्या दुकानात खरेदी केल्यास दहा टक्के कुपनधारकांना सूट मिळते. यापूर्वी हे कुपन फक्त एकदाच वापरण्याची मुभा देण्यात आली होती. यापुढील काळात आभार योजनेअंतर्गत भेट देण्यात येणारे कुपन शहरातील अनेक नामवंत दुकानांमध्ये वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. महिनाभरात हे कुपन कितीही वेळा वापरण्याची मुभा देण्यात आली असून खरेदीवर दहा टक्के सूट मिळणार आहे.
पोलिसांनी शहरातील ११५ नामवंत व्यावसायिकांना या योजनेत सहभागी करून घेतले आहे. शहरातील नामवंत मिठाई विक्रेते, उपाहारगृह, मॉल तसेच अन्य व्यावसायिक योजनेत सहभागी झाले आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.
वाहतूक नियम पाळणारया नागरिकांसाठी पुणे पोलिसांची “आभार कुपन भेट” योजना
RELATED ARTICLES