Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीवक्फ बोर्डची जमीन बळकावून बोर्ड, सरकार व नागरिकांची फसवणूक-डब्बू आसवानी

वक्फ बोर्डची जमीन बळकावून बोर्ड, सरकार व नागरिकांची फसवणूक-डब्बू आसवानी

३१जानेवारी २०२०
चिंचवड गावातील सर्व्हे नं. २८७ यांसी एकूण क्षेत्र ०१ हे. ६९ आर यांसी आकार १२ रुपये ५० पैसे मुळ मालक हसीदाभाई आप्पाबाई दारुवाले व इतर यांची होती. ७/१२ (पान नं.१) सदरी फेरफार नं. १८९० (पान नं.२) ने नोंद झाली होती. सदर सर्व्हे नंबर २८७ यांसी क्षेत्र ०१ हे. ६९ आर ही जमीन दिनांक १३ जुलै १९४४ रोजी वक्फनामा तयार करुन सदर मिळकत वक्फ करुन दान केली. सदर वक्फनामा हा मेहरबान सब रजिस्ट्रार हवेली नं. ३ यांचे कार्यालयात दस्त नं. १८१८/१९४४ अन्वये नोंदविलेले आहे (पान नं.३). वक्फनामानुसार ७/१२ सदरी अहमदभाई मनुलाल दारुवाले वक्फ मुतवल्ली यांची नोंद झाली असे ७/१२ वर वक्फबोर्डचे नाव असतानाही बांधकाम व्यवसायिक मे. वैष्णवी कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्मतर्फे भागीदारी पवन रघुमल वाधवानी व कन्हैया मोहनदार रजपुत आणि शासकीय अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांचेशी संगनमत करुन स्वत:चे नाव ७/१२ वर फेरफार नं. १४८४० नुसार (पान नं.४) मुळ मालक म्हणून नोंदवून घेतले हे बेकायदेशीर आहे.

त्यासाठी त्यांनी वक्फ बोर्डाची बोगस ना हरकत दाखलाचा क्रमांक दि.२७.१२.२०१० रोजीच्या भाडेपट्टा हस्तांतरण करारनामा क्र. ९६४०/२०१० हवली क्र. १३ यामध्ये पान नंबर ७ वर उल्लेख केलेला आहे (पान नं.५).शासनाच्या नियमानुसार वक्फ बोर्डाची अशी जमीन विकु शकत नाही. तसेच भाड्याने, लीडने देवू शकत नाही. असे असतानाही तलाठी, नंडल अधिकारी व बांधकाम व्यवसायिक मे. वैष्णवू कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्मतर्फे भागीदार पवन रघुमल वाधवानी व कन्हैया मोहनदार रजपुत यांनी कागदपत्राची फसवणुक करुन ७/१२ सदरची आपले नाव नोंदवून घेतले (पान नं. ६) आणि आता ही सर्व्हे नंबर २८७ यांसी क्षेत्र ०१ हे. १४ आर ही मिळकत ते शहरातील सर्वसामान्य नागरिकांना प्लॉटींग करुन विकत आहेत. यामध्ये जागेचे हक्कदार वक्फ बोर्ड, शासन, नागरिक आणि मनपा प्रशासन यांची सर्वाची फसवणूक करत आहेत.

या बांधकाम व्यवसायिकांवर फसवणुकीचा, शासकीय फसवणुकीचा, जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल करावा.
या सर्व केसमध्ये सहभागी असणा-या अधिकारी, बांधकाम व्यवसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पत्रकार परिषदेत केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments