११ नोव्हेंबर
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात अत्याधुनिक अल्ट्रासाउंड (सोनोग्राफी) मशीन उपलब्ध झाले असून, त्याद्वारे लष्कर परिसरातील नागरिकांना हृदयरोगाच्या निदानासाठी आवश्यक ‘टू डी इको’, ‘कलर डॉपलर’, ‘अॅनोमली स्कॅन’ आदी महागड्या उपचारसुविधा लष्कर
चंद्रप्रकाश फाउंडेशन आणि जे. जे. हेल्थ अँड केअर फाउंडेशनच्या वतीने नुकतेच सरदार पटेल रुग्णालयाला अत्याधुनिक अल्ट्रासाउंड मशीन मोफत देण्यात आले. फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश धोका यांच्या हस्ते या यंत्राचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. या वेळी बोर्डाचे उपाध्यक्ष विवेक यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, सदस्य अतुल गायकवाड, प्रियांका श्रीगिरी, रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड,
दीपचंद कटारिया, अशोक गुंदेचा, राजेंद्र बाठिया, कांतिलाल ओसवाल, शांताबाई छाजेड आदी उपस्थित होते.
हृदयविकाराचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या-चाचण्या केल्या जातात. त्यात टू डी इको, कलर डॉपलर या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हृदयाची रचना आणि कार्यक्षमतेविषयी माहिती मिळते. खासगी रुग्णालयांत या चाचण्यांसाठी सुमारे तीन ते चार हजार रुपये आकारले जातात. सरदार पटेल रुग्णालयाने या चाचण्या रास्त दरात उपलब्ध करून देण्यास प्रारंभ केला. मात्र, त्यासाठीचे मशीन सुमारे सात वर्षे जुने होते. आता नवे मशीन उपलब्ध झाले असून, गरीब आणि गरजू रुग्णांना अल्प दरात अद्ययावत तपासण्या करता येणार आहेत. त्यासाठी रुग्णालयात पूर्ण वेळ सोनोलॉजिस्ट आणि मानद तत्त्वावर कार्डिओलॉजिस्ट कार्यरत राहणार आहेत, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
रुग्ण व नातेवाइकांना मोफत भोजन
गुरुनानक देव यांच्या ५५० व्या जयंतीचे औचित्य साधून, प्रेरणा सेवा ट्रस्टतर्फे सरदार पटेल रुग्णालयातील रुग्ण व त्याच्यासमवेत असलेल्या एका नातेवाइकाला दररोज दुपारी आणि सायंकाळी मोफत भोजन दिले जाणार आहे. येत्या बुधवारपासून (१३ नोव्हेंबर) खासदार गिरीश बापट आणि बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत कुमार यांच्या हस्ते या उपक्रम सुरू होणार असून, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ, फिरोज पूनावाला, माजी खासदार कप्तानसिंह सोळंकी, आमदार सुनील कांबळे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.