२३ ऑक्टोबर
रोटरी क्लब ऑफ आकुर्डी आणि स्वच्छंद, पुणे यांच्यातर्फे ‘याद किया दिलने’ कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते़,
या वेळी रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश अगरवाल, सचिव शशिकांत शमा, जयदीप भगत उपस्थित होते, कार्यक्रमाच्या माध्यमातून रोटरी क्लब आकुर्डीतर्फे ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांत हँडवॉश मशिन बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली.
तसेच ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’, ‘मितवा’, ‘याद किया दिलने’, ‘तेरे बिना जिंदगी से कोई’, ‘इन्तेहा हो गयी’, ‘जय जय शिव शंकर’ अशा सदाबहार गाण्यांचा नजराणा रसिकांनी अनुभवला. निरंजन किर्लोस्कर, प्रियांका बर्वे, संदीप उबाळे, योगिता गोडबोले, रवींद्र शाळू, अजय अत्रे यांनी गाणी सादर केली. रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश अगरवाल, सचिव शशिकांत शमा, जयदीप भगत उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रवींद्र शाळू यांची होती. अजय अत्रे, विवेक परांजपे, नितीन शिंदे, बाबा खान, नीलेश देशपांडे, महेश अय्यर, केदार परांजपे, विजय मूर्ती यांनी गायकांना वाद्यसाथ केली. अमित सोमण यांनी ध्वनिसंयोजन केले़ स्पंदन यांनी सूत्रसंचालन केले.
रोटरी क्लब आकुर्डीतर्फे ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांत हँडवॉश मशिन बसविण्यात येणार
RELATED ARTICLES