Monday, July 15, 2024
Homeताजी बातमीरिव्हिटींग गांधी चर्चा रद्द करण्यासाठी धमकल्याचा आरोप - तुषार गांधी

रिव्हिटींग गांधी चर्चा रद्द करण्यासाठी धमकल्याचा आरोप – तुषार गांधी

७ फेब्रुवारी २०२०

पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये रिव्हिजिटिंग गांधी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. महात्मा गांधींवरील आयोजित चर्चासत्र अचानक रद्द करण्यात आलं आहे. षार गांधी यांचं गांधींजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त  आयोजित केलेल्या  कार्यक्रमातुन व्याख्यान होणार होतं. मात्र ऐनवेळी कोणतंही कारण न देता हे चर्चासत्र रद्द करण्यात आलं. तुषार गांधी यांनी आयोजकांना धमकी मिळत असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा आरोप केला आहे. कार्यक्रमामध्ये  पुणे गांधी भवनचे अन्वर राजन यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असा आरोप अन्वर राजन यांनी केला आहे.

प्रोग्रेसिव्ह इज्युकेशन सोसायटीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून ही राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित केली आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस ही कार्यशाळा होणार होती.  मात्र गुरुवारी अचानक तुषार गांधी यांना निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा निरोप देण्यात आला.

तुषार गांधी यांनी कार्यक्रम रद्द करण्यात आल्यानंतर ट्विट करत म्हटलं आहे की, “मला निमंत्रित केल्यामुळे मॉडर्न कॉलेजला गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडण्यात आलं आहे. पतीतपावन संस्थेला जर मी हजर राहिलो तर कार्यक्रम बंद पाडू अशी धमकी देण्यात आली. गोली मारो गँग पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये आली आहे”.

काही संघटनांच्या दबावातून तुषार गांधी यांना देण्यात आलेल निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी पत्रकाद्वारे या कृत्याचा निषेध केला आहे.

प्रॉग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी मात्र काही विद्यार्थ्यांना त्यांच्या आक्षेपार्ह भाषणाचे व्हिडीओ दाखवत निदर्शन करण्याचा इशारा दिला होता. परीक्षा सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूनच निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments