१३ डिसेंबर
दि. १४/१२/२०१९ वार शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन काळभोर नगर, आकुर्डी येथील उर्दु शाळेमध्ये करणेत आले आहे. म.न.पा. हद्दीतील थकबाकीदार मिळकतकर धारकांनी थकबाकीची १००% रक्कम भरल्यास म.न.पा. कराचे शास्ती (विलंब दंड) रकमेत ९०% सवलत मिळणार आहे व मिळकत कराच्या थकबाकीमध्ये ५० % थकबाकी भरल्यास विलंब दंड रकमेच्या ४५ % रक्कमेवर सवलत मिळणार आहे.तसेच पाणीपट्टी थकबाकीदार ग्राहकांनी थकबाकी रक्कम भरलेस दंडाच्या रकमेमध्ये ९० % सवलत मिळणार आहे. तरी म.न.पा. हद्दीतील थकबाकीदार नागरीकांना आवाहन करणेत येत आहे की कोर्टामार्फत आलेल्या नोटीसीनुसार थकबाकीची रक्कम भरुन मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात यावा. असे आवाहन विलास मडिगेरी सभापती,स्थायी समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांनी केले.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये थकबाकी रक्कम भरुन म.न.पा. कराच्या शास्तीमध्ये संधीचा लाभ घ्यावा -विलास मडिगेरी
RELATED ARTICLES