३१ आॅक्टोबर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि अन्य नेत्यांनी अजित पवारांच्या नावाला अनुमोदन दिलं.
विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलं,की आज राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी माझी निवड केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार,
मा.पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मोठ्या विश्वासानं सोपवलेली जबाबदारी मी इमाने इतबारे पार पाडेन,असा शब्द देतो.अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. हे सर्व जण आमच्यासोबत असते तर आमचं सरकार स्थापन झालं असतं.पण राजकारणात जर-तरला स्थान नसतं.आता आम्ही सभागृहात शेती, बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडू.
“1 लाख 65 हजार मताधिक्यानं निवडून आलो यावर अजूनही विश्वास नाही. सर्वांची डिपॉझिट बारामतीकरांनी जप्त केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” या शब्दात अजित पवारांनी विजयाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी सत्ताधारी पक्षाला यंदा दिवाळी गोड गेली नाही, असं म्हणत अजित पवारांनी भाजप-सेनेला टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांची निवड
RELATED ARTICLES